आयपीएल लिलावापूर्वी शाहरूख दिसला या खेळाडूसोबत

26  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

28  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. तत्पूर्वी कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याची उत्सुकता आहे. 

कोलकाता नाईट रायडर्सवर सर्वांचा नजरा लागून आहेत. कोणत्या सहा खेळाडूंना रिटेन करणार याची उत्सुकता आहे.

कर्णधार श्रेयस अय्यरला रिटेन करणार की नाही याबाबत शंका आहे. तर सुनील नरीन, रिंकु सिंह यांना रिटेन करणं जवळपास निश्चित आहे. 

केकेआरचा सहमालक शाहरूख खान एका खेळाडूसोबत पार्टीत दिसला. त्यामुळे रिटेन्शन करेल असं दिसत आहे. 

अफगाणिस्तानचा विकेटकीपर रहमानुल्लाह गुरबाजसोबत शाहरूख दुबईच्या पार्टीत दिसला. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुरबाज केकेआरच्या चॅम्पियन संघाचा भाग होता. पण त्याला रिटेन करणं कठीण आहे. फ्रेंचायझी त्याला लिलावात पुन्हा घेऊ शकते.

रिपोर्टनुसार, फ्रेंचायझी अष्टपैलू आंद्रे रसेला रिलीज करू शकते. त्यामुळे त्याच्यावर इतर फ्रेंचायझीच्या नजरा असतील.