मला त्रास...! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मोहम्मद शमीने घेतला मोठी निर्णय
20 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने स्वत: फिट असल्याचं घोषित केलं आहे. तसेच खेळण्यासाठी सज्ज आहे.
शमीने स्पष्ट केलं की, आता त्याच्या पायाचं दुखणं नाही. तसेच त्याने जोरदार बॉलिंग प्रॅक्टिस केली.
शमीने सांगितलं की, फिटनेस सिद्ध करण्यासाठी दोन रणजी ट्रॉफी सामने खेळू शकतो. लवकरच बंगालसाठी मैदानात उतरू शकतो.
शमीने सांगितलं की, ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी जास्तीत जास्त गोलंदाजी करण्याचा मानस आहे. त्यामुळे रणजी ट्रॉफीत खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
मोहम्मद शमी वर्ल्डकप फायनलनंतर टीम इंडिया बाहेर आहे. शमीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर सर्जरी झाली होती.
शमीने बंगळुरुच्या एनसीएमध्ये गोलंदाजीचा सराव केला. यावेळी त्याच्या पायावर पट्टी बांधलेली होती.
रोहित शर्माने नुकतंच सांगितलं होतं की, कोणत्याही अनफिट गोलंदाजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेणार नाही. पण आता शमी स्वत: फिट असल्याचं सांगतोय.