कोहली-रोहितचे चाहते भिडले, सेमीफायनलआधीच वाद सुरू
14 November 2023
Created By : Manasi Mande
वनडे वर्ल्ड कप 2023मध्ये आता सेमी-फायनलचे युद्ध सुरू झाले आहे. भारत-न्युझीलंड दरम्यान पहिला सामना रंगेल. (Photos : Social media)
15 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडिअमवर हा सामना होईल. पण त्यापूर्वी मैदानाबाहेर एक वेगळाच वाद सुरू झालाय.
हा वाद विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये सुरू आहे. मात्र त्यासाठी ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्स हे कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
खरंतर, ब्रॉडकास्टरचा एक फोटो व्हायरल होतोय, ज्यात भारत-न्युझीलंड मॅचसह कोहली आणि विल्यमसनचा फोटो आहे.
रोहित शर्माचे उत्तम योगदान असतानाही ब्रॉडकास्टर फक्त कोहलीला हिरो बनवत आहेत, असा आरोप चाहत्यांनी केला आहे.
यावरूनच कोहली आणि रोहितच्या चाहत्यांमध्ये वाद सुरू आहे.
2011 च्या वर्ल्डकपमध्ये गौतम गंभीरचे उत्तम योगदान होते पण धोनीलाच हिरो बनवून फेमस केलं, अशी कमेंट एका युजरने केली. सध्या हा वाद वाढतानाच दिसत आहे.
मासे पाण्यात झोपतात तरी कधी ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा