सारा तेंडुलकरने आयुष्यात पहिल्यांदा केलं हे काम, पाहा व्हीडिओ
11 डिसेंबर 2024
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर एक्टीव्ह असते, ती कायमच काही न काही शेअर करते
सारा नुकतीच दुबई दौऱ्यावर तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर याच्यासोबत होती, दोघांनी तिथे सुट्ट्यांचा आनंद लुटला, त्यानंतर आता साराने एक व्हीडीओ पोस्ट केला आहे
साराने उत्तराखंडमधील ऋषिकेशमधील व्हीडिओ पोस्ट केलाय, या व्हीडिओ तिने तिच्या पहिल्या गंगा मातेच्या आरतीबद्दल सांगितलंय
"जिथे मनाला शांती मिळते आणि आत्म्याला घरासारखं वाटतं, गंगा मातेची आरती करण्याची पहिली वेळ मला कायम लक्षात राहिल", असं साराने म्हटलं
सारा तिची आई अंजली तेंडुलकरसह गेल्याच महिन्यात ऋषिकेशला गेली होती, मात्र आता व्हीडिओ पोस्ट केला आहे
सारा आणि अंजली तेंडुलकर या दोघी 4 दिवस ऋषिकेशला होत्या, दोघांनी तिथे फार चांगला वेळ घालवला
दरम्यान साराची नुकतीच सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे