सिडनी कसोटी सामन्यादरम्यान दिग्गज भारतीय खेळाडू निवृत्त
3 जानेवारी 2025
टीम इंडिया एका बाजूला सिडनीत पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना खेळत आहे, तर दुसऱ्या बाजूला एका भारतीय खेळाडूने निवृत्ती घेतली आहे
सौराष्ट्रचा दिग्गज खेळाडू आणि विकेटकीपर शेल्डन जॅक्सन याने व्हाईट बॉलमधून अर्थात लिस्ट ए आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे
शेल्डन जॅक्सनने लिस्ट ए कारकीर्दीतील शेवटचा सामना हा पंजाबविरुद्ध खेळला
शेल्डन जॅक्सनने शेवटच्या सामन्यात 13 धावा केल्या, शेल्डनच्या संघाचा 57 धावांनी पराभव झाला
शेल्डन जॅक्सनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 9 शतकं आणि 14 अर्धशतकांसह 2 हजार 792 धावा केल्या आहेत
शेल्डन जॅक्सनने 84 टी 20 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 11 अर्धशतकांसह 1 हजार 812 धावा केल्यात
शेल्डन जॅक्सनने आयपीएलमधील 9 सामन्यांमध्ये 10.17 च्या सरासरीने 61 धावा केल्या