पाच वर्षानंतर अभिषेक शर्मासोबत आयपीएलमध्ये घडलं असं काही..
30 March 2025
Created By: राकेश ठाकुर
आयपीएल स्पर्धेतील दहावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला.
सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. यावेळी अभिषेक शर्माने एका चेंडूत 1 धाव करत बाद झाला.
अभिषेक शर्मा या सामन्यात धावचीत झाला. चुकीचा कॉल आणि धाव घेताना अडखळला आणि विकेट देऊन बसला.
अभिषेक शर्माला रन आऊट करण्यात ट्रेव्हिस हेडची चुकी असल्याचं नेटकरी सांगत आहेत .
ट्रेव्हिस हेडने बॅटला चेंडू लागताच धाव घेतली. पण अभिषेकने नकार दिला होता. पण तरीही धावला आणि मजबुरीत अभिषेक शर्मा धावचीत झाला.
अभिषेक शर्मा आयपीएलच्या 5 वर्षात 57 डावानंतर धावचीत झाला आहे.
अभिषेक शर्मा आयपीएल 2025 स्पर्धेत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. तीन डावात त्याने 24, 6 आणि आता 1 धाव केली आहे.