'द हंड्रेड'लीगची क्रिकेट टीम खरेदी करणार 2900 कोटीचा हा  स्टार   ?

17  september 2024

Created By: Atul Kamble

सलग दोन आठवडे शहाळ्याचं पाणी प्यायल्यास अनेक फायदे होतील

इंग्लंड क्रिकेट बोर्डाची स्पर्धा 'द हंड्रेड'मध्ये  हॉलीवूडचा सुपरस्टार टीम खरेदी करणार आहे

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्वत: 6 टीम बनवून ही स्पर्धा सुरु केली होती. आता त्यातील भागीदारी विकली जात आहे

यातील एक टीम अभिनेता 'डेडपूल स्टार' रायन रेनॉल्ड्स खरेदी करणार आहे

कॅनेडीय सुपरस्टार रेनॉल्ड्स आणि रॉब मॅकेल्हेनी 'द हंड्रेड'मध्ये वेल्सची टीम वेल्श फायर खरेदी करणार

वेल्सच्या ग्लेमॉर्गन काऊंटी क्रिकेट क्लबच्या डॅन चेरी यांनी सांगितले की रेनॉल्ड्सना वेल्श फायर खरेदी करणार आहे

वेल्श फायरमध्ये 51 टक्के वाटा ग्लेमॉर्गनजवळ आहे उर्वरित 49 टक्क्यांसाठी रेनॉल्ड्स सह अनेक इच्छुक आहेत

 रेनॉल्ड्स (2900 कोटी संपत्ती)आणि मॅकेल्हेनी (450 कोटी) यांनी 4 वर्षांपूर्वी वेल्सचा फुटबॉल क्लब खरेदी केला

दोघांनी मिळून 21 कोटीत जगातील तिसरा सर्वात जुना क्लब खरेदी केला होता.

सलग दोन आठवडे शहाळ्याचं पाणी प्यायल्यास अनेक फायदे होतील