23 मार्च 2025
धोनीसोबतची मैत्री फक्त 10 कोटी रुपयांमुळे तुटली!
धोनीसोबत एक खेळाडू 81 सामन्यांसाठी जोडला होता. धोनीने त्याची कारकिर्द घडवली आणि आकार दिला.
आयपीएल 2025 मध्ये 81 सामन्यांच्या त्या भागीदारीसाठी जवळपास 10 कोटी रुपयांचा करार भारी पडला आहे.
दीपक चाहरची आयपीएलमध्ये धोनीसोबत 81 सामन्यांपासून मैत्री होती.
दीपक चाहरने आयपीएलमध्ये धोनीसोबत दोन संघांसोबत खेळला आहे. यात सीएसके आणि आरपीएस संघ आहे.
आयपीएलमध्ये दीपक चाहर पहिल्यांदाच धोनीसोबत खेळत नाही. त्याच्या विरोधात खेळत आहे.
दीपक चाहर यावेळी मुंबई इंडियन्ससोबत आहे. मेगा लिलावात मुंबईने दीपक चाहरला 9.25 कोटी रुपये खर्च करून संघात घेतलं.
दीपक चाहरने धोनीसोबत खेळलेल्या 81 आयपीएल सामन्यात 77 विकेट घेतले आहेत. आता धोनीशिवाय काय करतो ते पाहणं औत्सुक्याचं आहे.