8 नोव्हेबर 2024

दिल्ली कॅपिटल्सला लिलावात फक्त 2.5 खर्च करता येणार

Created By: राकेश ठाकुर

वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वापूर्वी पाच संघांनी रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव पार पडणार आहे. 

वुमन्स प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक संघाला सहा विदेशी खेळाडू आणि एकूण 18 खेळाडू ठेवण्याची परवानगी आहे. सर्व संघाकडे पर्समध्ये 15 कोटी आहेत. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एकूण 14 खेळाडू रिटेन केले आहेत. आता पर्समध्ये 3.25 कोटी असून जास्तीत जास्त 4 खेळाडू घेऊ शकतात. 

गुजरात जायंट्सकडे 4.40 कोटी रुपये आहेत. संघात फक्त चार जागा आहेत. त्यामुळे फ्रेंचायझी सर्वात मोठी बोली लावू शकते.

यूपी वॉरियर्सकडे 3.90 कोटी शिल्लक आहेत. यूपीने 15 खेळाडू रिटेने केले आहेत. जास्तीत जास्त 3 खेळाडू रिटेन करता येतील. 

मुंबई इंडियन्सने 14 खेळाडू रिटेन केले आहेत. मिनी लिलावासाठी 2.65 कोटी शिल्लक आहेत. जास्तीत जास्त चार खेळाडू घेता येतील.

दिल्ली कॅपिटल्सने 14 खेळाडू रिटेन केले आहेत. आता फक्त 2.5 कोटी शिल्लक असून जास्तीत जास्त 4 खेळाडू विकत घेऊ शकतात.