युजवेंद्र चहलच्या बर्थडेला धनश्री झाली ट्रोल
23 July 2024
Created By: राकेश ठाकुर
युजवेंद्र चहल 23 जुलैला 34 वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.
चहलच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याला पत्नी धनश्री वर्मानेही शुभेच्छा दिल्या. धनश्रीने त्याला जगातील सर्वश्रेष्ठ फिरकीपटू म्हणून संबोधलं.
धनश्रीचा या शुभेच्छा चहलच्या चाहत्यांना भावल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी धनश्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
धनश्रीने त्याला क्रिकेटपटू म्हणून शुभेच्छा दिल्या. यात पती-पत्नी किंवा भावनिक टच दिसला नाही. यामुळे चाहते नाराज झाले.
धनश्रीने या पोस्टच्या माध्यमातून टीम इंडियावर निशाणा साधल्याचं देखील बोललं जात आहे. काही चाहत्यांनी असा अंदाज वर्तवला आहे.
चहल टी20 वर्ल्डकप संघात होता. मात्र एकही सामना खेळला नाही. तसेच श्रीलंका दौऱ्यातही त्याला वगळण्यात आलं. त्यामुळे धनश्री नाराज असल्याची चर्चा आहे.
भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवनेही चहलसाठी खास पोस्ट केली. त्याने चहलचे दोन फोटो शेअर केले आणि लिहिले, ‘भाऊ, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’