आयपीएल 2025 पूर्वी धोनीने तोडलं चाहत्यांचं मन, घेतला मोठा निर्णय

12  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी रिटेन्शनची यादी लवकरच जाहीर केली जाईल. त्यामुळे धोनी खेळणार की नाही लवकरच कळेल. 

आयपीएल 2025 पूर्वी महेंद्रसिंह धोनीने मोठी निर्णय घेतला आहे. त्याने आपली हेअरस्टाईल बदलली आहे. त्याचा नवा लूक व्हायरल होत आहे. 

धोनीचा हेअरकट कायम चर्चेत असतो.पण लांब केसांसह धोनी चाहत्यांना आवडतो. पण आता त्याने लांब केसांचा निरोप घेतला आहे. 

धोनी आता क्लासी साइट फेडेड हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे. पण त्याला लांब केसात पाहण्याची चाहत्यांना सवय झाली आहे.

मागच्या पर्वात धोनी लांब केसांसह खेळला होता. कारण धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला तेव्हा त्याचे लांब केस होते. 

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने रिटेन्शन नियम जाहीर केला आहे. त्यामुळे धोनी खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

नव्या नियमानुसार, जो खेळाडू पाच कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्लेइंग 11 मध्ये खेळला नाही किंवा बीसीसीआय करार नसेल तो अनकॅप्ड खेळाडू असेल.