धोनी-रोहित की विराट..! आयपीएलमध्ये कोणी केली सर्वाधिक कमाई?
आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या दहाव्या क्रमांकावर आहे. या पर्वासह त्याने 105.65 कोटी कमावले.
नवव्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन असून त्याने आतापर्यंत 108.58 कोटी कमावले आहेत.
सुरेश रैना या यादीत आठव्या स्थानी असून त्याने 110.74 कोटी कमावले आहेत. रैना आयपीएलमधून रिटायर झाला आहे.
केएल राहुल या यादीत सातव्या स्थानी असून त्याने 113.10 कोटी कमावले आहेत.
ऋषभ पंतला मेगा लिलावात 27 कोटी मिळाले आहेत. यासह त्याची कमाई आता 117.80 कोटीपर्यंत पोहोचली आहे.
पाचव्या स्थानावर सुनील नरीन असून सर्वाधिक कमाईच्या यादीत एकमेव विदेशी खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 125.24 कोटी रुपये कमावले आहेत.
अष्टपैलू रवींद्र जडेजा चौथ्या स्थानी असून त्याने 143.01 कोटी कमावले आहेत.
महेंद्रसिंह धोनी या यादीत तिसऱ्या स्थानावर असून त्याने 192.84 कोटी कमावले आहे. सध्या अनकॅप्ड खेळाडू म्हणून त्याची गणना होत असून या पर्वात 4 कोटी मिळाले.
विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या पर्वापासून आरसीबीसोबत आहे. त्याने एकूण 209.20 कोटी कमावले आहेत.
रोहित शर्मा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 210.90 कोटींची कमाई केली आहे.