10 जानेवारी 2025
रवींद्र जडेजा क्रिकेटला रामराम ठोकण्याच्या तयारीत?
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाचा 3-1 असा पराभव झाला. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं स्वप्नही हुकलं आहे.
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतच फिरकीपटू आर अश्विनने क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना धक्का दिला.
दुसरीकडे, रोहित शर्माही खराब कामगिरीनंतर निवृत्ती घेईल अशा अफवा उडाल्या होत्या. पण तसं काही झालं नाही.
असं असताना अष्टपैलू रवींद्र जडेजा निवृत्ती घेईल की काय अशी भीती चाहत्यांना सतावत आहे. त्याचा एक फोटो यासाठी कारणीभूत ठरला आहे.
जडेजाने 10 जानेवारीला इंस्टाग्रामवर स्टोरीत आपल्या कसोटी जर्सीचा फोटो पोस्ट केला आहे. यावर 8 नंबर लिहिलेला आहे.
या फोटोमुळेच खळबळ उडाली आहे. क्रीडारसिकांनी या फोटोवरून कसोटीतून निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे का? असं विचारलं.
जडेजाने ही जर्सी पोस्ट करण्याचं नेमकं काय ते माहिती नाही. आता हे जडेजाच सांगू शकतो. पण ऑस्ट्रेलियात त्याची कामगिरी काही खास नव्हती.