6 नोव्हेबर 2024
जगातील या मैदानावर खेळले गेले सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने
Created By: राकेश ठाकुर
बांग्लादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. हे सामने युएईतील शारजाह स्टेडियममध्ये होत आहेत.
या मालिकेतील पहिल्या सामन्यासह या स्टेडियमचे नाव इतिहासात नोंदवलं गेलं आहे. लॉर्ड्स आणि मेलबर्नसारख्या स्टेडियमला मागे टाकत नंबर 1 ठरलं आहे.
शारजाह स्टेडियम 300 आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करणारं जगातील पहिलं स्टेडियम आहे. यात 252 वनडे, 38 टी20 आणि 10 सामने खेळले आहेत.
शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता. हा सामना श्रीलंका पाकिस्तान यांच्यात झाला.
शारजाहनंतर सिडनी क्रिकेट स्टेडियमवर सर्वाधिक सामने खेळले गेलेत. या मैदानावर 291 आंतरराष्ट्रीय सामने झालेत.
ऑस्ट्रेलियाचं मेलबर्न या यादीत तिसऱ्या स्थानावर असून 287 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
लवकरच सिडनी आणि मेलबर्न मैदान आंतरराष्ट्रीय सामन्यांचं त्रिशतक ठोकणार आहेत.