150 किमी प्रतितासाच्या वेगाने टाकले 100 हून अधिक चेंडू!

25 सप्टेंबर 2024

Created By: राकेश ठाकुर

कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात एकापेक्षा एक सरस गोलंदाज आले. पण वेगाने खळबळ उडवतील असे कमीच..

इंग्लंडचा मार्क वूड वेगाचा बादशाह ठरला असून या यादीत टॉपवर आहे. 

2018 पासून मागच्या सहा वर्षात त्याने कसोटीत 150 किमी प्रतितासाच्या वेगाने 100 हून अधिक चेंडू टाकले.

मार्क वूडने सहा वर्षात कसोटीत 109 चेंडू 150 किमी प्रतितासाने फेकले. यात तीन विकेट घेतल्या.

मार्क वूडच्या आसपासही कोणी नाही. कारण इतर गोलंदाजांनी 50 चेंडूही 150 किमी प्रतितासाने टाकलेले नाहीत. 

एनरिक नॉर्खिया या यादीत दुसऱ्या स्थानी असून त्याने 150 किमी प्रतितासाहून अधिक वेगाने 41 चेंडू टाकले.

ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क तिसऱ्या स्थानावर असून त्याने 40 चेंडू इतक्या वेगाने टाकले असून 2 विकेट घेतल्यात.