गौतम गंभीरला आयसीसीच्या या निर्णयामुळे डोकेदुखी!
22 June 2024
Created By: राकेश ठाकुर
गौतम गंभीरने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी मुलाखत दिली आहे. आता काय निर्णय येतो हे आठ दिवसात कळेल.
प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असताना गौतम गंभीरने आपलं आक्रमक रूप दाखवत एक मुद्दा उचलला आहे.
गौतम गंभीर स्वत: एक फलंदाज असताना नियम बदलण्याची मागणी करणार आहे. यामुळे फलंदाजांना मदत होत असल्याचं म्हणणं आहे.
गंभीरने सांगितलं की, वनडे क्रिकेटमध्ये दोन नवे चेंडू वापरणं चुकीचं आहे. हा नियम 2011 पासून लागू केला असून फलंदाजांच्या फायद्याचा आहे.
गौतम गंभीरने जोर देत सांगितलं की, क्रिकेटमध्ये एक बदल होणं गरजेचं आहे. मर्यादीत ओव्हर्स क्रिकेटमध्ये 2 नवे चेंडूंचा वापर बंद व्हायला हवा.
नव्या चेंडूमुळे फिंगर स्पिनर्सला मदत मिळत नाही. त्यामुळे स्पिनर्स कमी खेळताना दिसत असल्याचं गौतम गंभीरने सांगितलं.
आयसीसीच्या या नियमामुळे फिंगर स्पिनर्सला फटका बसला. तसेच वनडे क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्विंगही पाहायला मिळत नाही.