विराट कोहली आयुष्यभर लक्षात ठेवेल गंभीरचे उपकार

18  सप्टेंबर 2024

Created By: राकेश ठाकुर

गौतम गंभीर आणि विराट कोहली सध्या चर्चेत आहेत. या दोघांची एक मुलाखत व्हायरल होत आहे. 

आयपीएलदरम्यान या दोन्ही खेळाडूंमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. पण टीम इंडियासाठी दोघांनी अनेक सामने जिंकून दिले आहेत. 

विराट कोहलीच्या कारकि‍र्दीच्या सुरुवातील गौतम गंभीर त्याच्या पाठी उभा राहिला आहे.तो क्षण विराट कधीच विसरू शकत नाही. 

विराट कोहलीने 2009 मध्ये पहिलं शतक झळकावलं होतं. पण गंभीरला शतकी खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला. गंभीरने हा पुरस्कार विराटला दिला होता.

कोलकात्यात विराटने श्रीलंकेविरुद्ध 114 चेंडूत 107, तर गंभीरने 137 चेंडूत 150 धावा केल्या होत्या. 

विराट आणि गंभीरने 224 धावांची भागीदारी केली. त्यांच्या या खेळीमुळे भारताने 316 धावांचं लक्ष्य 48.1 षटकात गाठलं. 

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतकं झळकावली. पण पहिलं शतक गंभीरमुळे लक्षात राहिलं.