6 जानेवारी 2025
विराट-रोहित आता इंग्लंडच्या संघातून खेळणार?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल गेले.
टीम इंडिया टेस्ट फॉर्मेटमध्ये चांगलं प्रदर्शन करण्यासाठी हरभजन सिंगने एक पर्याय सूचवला आहे.
हरभजन सिंगने यूट्युब चॅनेलवर सांगितलं की, विराट-रोहित शर्माने टीम इंडियापेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे निवड कामगिरीच्या आधारावर व्हायला हवी.
हरभजनच्या मते, या खेळाडूंना इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायचीअसेल तर त्यांना काउंटी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे.
हरभजन सिंगने, सिडनी कसोटी संघाच्या निवडीवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. कोणत्या पार्श्वभूमीवर सिडनी कसोटी दोन फिरकीपटू खेळवले.
हरभजन सिंगने सांगितलं की, जर जसप्रीत बुमराह नसता तर बॉर्डर गावस्कर मालिकेत भारताचा 5-0 किंवा 4-0 ने पराभव झाला असता.
हरभजन सिंगने सांगितलं की, निवड नावाऐवजी कामगिरीच्या आधारावर झाली पाहीजे.