21 मार्च 2025
पाकिस्तानसाठी टी20 मध्ये झळकावलं सर्वात वेगवान शतक
पाकिस्तान न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने 205 धावांचं लक्ष्य गाठलं.
22 वर्षीय हसन नवाजने या सामन्यात नाबाद 105 धावा केल्या आणि एक रेकॉर्ड नोंदवला.
हसन नवाज पाकिस्तानसाठी सर्वात वेगवान टी20 शतक करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 44 चेंडूत शतक ठोकलं.
बाबर आझमने यापूर्वी 49 चेंडूत टी20 शतक ठोकलं होतं.. त्याने 2021 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली होती.
अहमद शहजादने 2014 मध्ये 58 चेंडूत शतक ठोकलं होतं. बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी केली होती.
पाकिस्तानसाठी चौथं वेगवान शतक बाबर आझमच्या नावावर आहे. त्याने 62 चेंडूत शतक ठोकलं होतं.
मोहम्मद रिझवान या यादीत पाचव्या स्थानी असून 2021 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 63 चेंडूत शतक ठोकलं होतं.