अश्वनी कुमारने हे फळ खाऊन केकेआरला ढेर केलं
1 April 2025
Created By: Sanjay Patil
मुंबई इंडियन्सचा गोलंदाज अश्वनी कुमार याने पदार्पणात उल्लेखनीय कामगिरी केली
अश्वनीने केकेआरविरुद्ध सोमवारी 31 मार्चला 3 षटकांत 24 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या
अश्वनीला या कामगिरीनंतर रवी शास्त्री यांनी काय खाल्लं होतं? असा प्रश्न केला, यावर अश्वनीने काय उत्तर दिलं?
पहिल्या सामन्याचा दबाव असल्याने जेवलोच नाही, फक्त केळ खाऊन मैदानात उतरलो, असं उत्तर अश्वनीने दिलं
अश्वनीने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली, अश्वनीने केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणेला आऊट केलं
तसेच अश्वनीने रिंकु सिंह, मनीष पांडे आणि आंद्रे रसेल या तिघांनाही मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला
अश्वनी आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पदार्पणात 4 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला