14 नोव्हेबर 2024

टी20 पदार्पणात पहिल्याच चेंडूवर 8 खेळाडूंनी मारला षटकार, 6 खेळाडूंचं करिअर संपलं

Created By: राकेश ठाकुर

रमणदीप सिंहने पदार्पणच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. टी20 असं करणारा 8वा फलंदाज ठरला आहे. 

कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही पहिल्या टी20 सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. 

भारताचे दोन फलंदात वगळता इतर सहा फलंदाजांची टी20 पदार्पणात पहिल्या चेंडूवर षटकार मारला आहे. त्यांचं करिअर संपलं आहे. 

वेस्ट इंडिजचे चार खेळाडू या यादीत आहेत. यात जेरोम टेलर, झेव्हियर मार्शल, कायरन पोलार्ड आणि टिनो बेस्ट हे खेळाडू आहेत. यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

दक्षिण अफ्रिकेच्या मँगालिसे मोसेल यांनी पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. पाकिस्तानचा सोहेल तनवीर या यादीत आहे.

सूर्यकुमार यादव आणि रमणदीपमध्ये खूप क्रिकेट बाकी आहे. त्याचं करिअर अजून बरंच आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.