IPL 2025 : सौरव गांगुलीचा पत्ता कट! दिल्ली कॅपिटल्सला 'गंभीर'चा शोध

16 July 2024

Created By:  Rakesh Thakur

दिल्ली कॅपिटल्स मुख्य प्रशिक्षकपदावरून रिकी पॉन्टिंगला दूर केलं आहे. त्यामुळे गांगुलीच्या नावाची चर्चा आहे. 

रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स सौरव गांगुलीला हेड कोच बनवण्याच्या मनस्थितीत नाही. 

दिल्ली कॅपिटल्सला गौतम गंभीरसारख्या प्रशिक्षकाची गरज असल्याचा दावा मिडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

गांगुली सध्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ संचालक आहे. गांगुली दुबई कॅपिटल्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्सचे काम पाहतो. 

दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्रानुसार, गांगुलीकडे आधीपासून संचालकपद आहे. त्यामुळे प्रशिक्षकासाठी दुसऱ्या नावाचा शोध सुरु आहे

गौतम गंभीर गेल्या सात वर्षांपासून दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक राहिला आहे. पण जेतेपदावर नाव कोरण्यात संघाला अपयश आलं.

दिल्ली कॅपिटल्ने आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे फ्रेंचायसी एका चांगल्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे.