पहिल्या पाच सामन्यात डेब्यू करणारे खेळाडू ठरले सामनावीर, जाणून घ्या
26 March 2025
Created By: राकेश ठाकुर
आयपीएलचे पाच सामने पार पडले असून प्रत्येक सामन्यात एक साम्य आहे. नव्या संघाकडून डेब्यू करणारे खेळाडू सामनावीर ठरले आहेत.
आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यात कृणाल पांड्या सामनावीर ठरला. या सामन्यातून त्याने आरसीबीत पाऊल ठेवलं होतं.
दुसरा सामना हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात झाला. या सामन्यात हैदराबादकडून पहिल्यांदा खेळणारा इशान किशन सामनावीर ठरला.
तिसरा सामना चेन्नई आणि मुंबईत झाला. या सामन्यात पिवळ्या जर्सीत डेब्यू करणारा नूर अहमद सामनावीर ठरला.
चौथा सामना दिल्ली आणि लखनौ यांच्यात झाला. या सामन्यात दिल्लीकडून पदार्पण करणारा आशुतोष शर्मा सामनावीर ठरला.
पाचवा सामना पंजाब आणि गुजरात यांच्यात झाला. पंजाब किंग्सचा कर्णधार पदार्पणाच्या सामन्यात चमकला. 97 धावा केल्याने त्याला सामनावीराच पुरस्कार मिळाला.
पाच खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर एकमेव खेळाडू आहे. जो कर्णधार असून पंजाबकडून पदार्पणाच्या सामन्यात चमकला.