आयपीएलच्या 18 व्या मोसमात डाव्यांची चलती, विकेट्स घेण्यात डावखुरे आघाडीवर
2 April 2025
Created By: Sanjay Patil
18 व्या मोसमाच्या सुरुवातीला काही सामन्यांत धावांचा डोंगर, मात्र त्यानंतर मोठी धावसंख्या करण्यात फलंदाज अपयशी
याचं कारणं म्हणजे प्रभावी गोलंदाजी, आतापर्यंत 18 व्या मोसमात डावखुरे गोलंदाज प्रभावी ठरत आहेत
डावखुऱ्या गोलंदाजांचा सामना करणं आव्हानात्मक ठरतंय, असं म्हटलं तर चूकीचं ठरणार नाही
18 व्या मोसमात 14 सामन्यांनंतर पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप 5 पैकी 4 डावखुरे गोलंदाज
चेन्नई सुपर किंग्सचा डावखुरा स्पिनर नूर अहमद नंबर 1, नूरने 3 सामन्यात 9 विकेट्स घेतल्यात
दिल्ली कॅपिट्ल्सचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 8 विकेट्स घेतल्या आहेत
तर चौथ्या स्थानी साई सुदर्शन आणि पाचव्या क्रमांकावर सीएसकेचा खलील अहमद, दोघांच्या नावावर 6-6 विकेट्स