एक नंबर अभिषेक शर्मा, हैदराबादच्या ओपनरपुढे कुणीच नाही
13 April 2025
Created By: Sanjay Patil
अभिषेक शर्मा विजयी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज ठरला आहे
अभिषेकने याबाबतीत 355 दिवसांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे
अभिषेकने 12 एप्रिलला पंजाबविरुद्ध 55 चेंडूत 141 धावांची खेळी केली
याआधी मार्कस स्टोयनिस याने 23 एप्रिल 2024 रोजी सीएसकेविरुद्ध 124 धावा केल्या होत्या
स्टोयनिसने तेव्हा 13 वर्षांआधीचा पॉल वॅलथाटी याचा रेकॉर्ड ब्रेक केला होता
अभिषेकने आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक करत हा महारेकॉर्ड ब्रेक केला
अभिषेक हैदराबादसाठी एका डावात 10 सिक्स लगावणारा पहिला फलंदाज ठरला