महेंद्रसिंह धोनीची Ipl मध्ये कर्णधार म्हणून कामगिरी कशी? पाहा आकडे

10 April 2025

Created By: Sanjay Patil

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आयपीएलच्या 18 व्या मोसमातून दुखापतीमुळे बाहेर

ऋतुराजला 30 मार्चला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तुषार देशपांडेच्या बॉलिंगवर कोपऱ्याला दुखापत

ऋतुराजऐवजी आता पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनी याच्याकडे चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी

महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये सीएसके आणि रायजिंग पुणे सुपर जायंट्स या 2 संघांचं नेतृत्व केलंय

धोनीने 2008 ते 2023 दरम्यान एकूण 226 सामन्यात नेतृत्व केलं आहे, त्यापैकी 133 सामन्यांत विजय

तर धोनी 91 सामन्यांमध्ये आपल्या टीमला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला आहे

धोनीची कर्णधारपदाची विजयी टक्केवारी ही 59.37 अशी आहे