29 डिसेंबर 2024

जसप्रीत बुमराहची निवड कोणी आणि कशी केली होती?

जसप्रीत बुमराह भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत विकेटच्या बाबतीत पाठीपुढे कोणीच नाही.

बुमराहने कसोटीत 200 विकेट पूर्ण केल्या आहेत. 19.38 च्या सरासरीने विकेट घेतल्या आहेत. जगातील इतर गोलंदाजांच्या तुलनेत खूपच कमी आहे. 

जसप्रीत बुमराह इथपर्यंत पोहोचवण्यास आणि त्याची निवड कोणी केली असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. 

जसप्रीत बुमराहवर सर्वात पहिली नजर न्यूजीलंडचामाजी कर्णधार जॉन राइटची पडली होती. जॉनमुळेच बुमराहला आयपीएलमध्ये स्थान मिळालं. 

जॉन राइट न्यूझीलंडचा क्रिकेटपटू आणि भारतीय संघात कोच राहिले आहेत. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली.

जॉन राइट युवा खेळाडूच्या शोधात असताना बुमराहला अहमदाबादमध्ये गोलंदाजी करताना पाहिलं. त्यानंतर पार्थिवकडून त्याची माहिती घेतली.

बुमराहची 2013 मध्ये आयपीएलमध्ये एन्ट्री झाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. तसेच अनेक विक्रम नोंदवले.