जसप्रीत बुमराहला खेळरत्न पुरस्कार मिळाला नाही, कारण..
देशातील सर्वोच्च क्रीडापुरस्कार असलेल्या खेळरत्न विजेत्यांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यात चार खेळाडूंचा समावेश आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दोन मेडल जिंकणारी नेमबाज मनु भाकर आणि बुद्धीबळपटू डी गुकेश, हॉकी टीमचा कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि पॅरालिम्पिक गोल्ड विजेता प्रवीण कुमार यांचा समावेश आहे.
खेळरत्न पुरस्कारात जसप्रीत बुमराहचं नाव नसल्याने क्रीडाप्रेमी आश्चर्यचकीत आहेत. कारण 2024 वर्षात त्याने मोठी कामगिरी केली आहे.
17 वर्षानंतर टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जिंकला. या स्पर्धेत प्लेयर ऑफ द टूर्नामेंट होता. तसेच अनेक रेकॉर्ड नोंदवले असून आयसीसीने पुरस्कारासाठी नामांकित केलं आहे.
बुमराहने 2024 वर्षात क्रिकेटमध्ये इतकं योगदान देऊनही त्याच्या नावाचा खेळरत्न पुरस्कारासाठी विचार झाला नाही. यामागे बीसीसीआय कारण आहे.
खेळरत्नासाठी बीसीसीआय, SAI सारख्या संस्थांना आणि राज्य सरकारला नामांकन पाठण्याची विनंती केली जाते. पण बीसीसीआयने नामांकन पाठवलंच नाही.
नामांकन पाठवण्यासाठी चार वर्षातील चांगली कामगिरी आणि डोपिंग एजेंसीकडून पेनल्टी किंवा कोणताही तपास प्रलंबित नसावा.