जसप्रीत बुमराह षटकार मारणं जवळपास कठीण!
24 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहविरुद्ध कोणत्याही फॉर्मेटमध्ये धावा करणं जवळपास कठीण आहे.
कसोटी आणि टी20 क्रिकेटमध्ये बुमराह फलंदाजांवर तुटून पडतो. फक्त धावाच रोखत नाही तर विकेटही घेतो.
बुमराह सर्वात इकोनॉमीकल गोलंदाज आहे. कारण मागच्या 6 वर्षात कसोटीत त्याच्या नावावर खूपच कमी षटकार आहेत.
2019 पासून आतापर्यंत बुमराहने 57 डावात फक्त 2 षटकार दिले. त्याच्यापेक्षा कमी 32 डावात एक षटकाराचा विक्रम उमेश यादवच्या नावावर आहे.
सर्वात जास्त षटकार खाणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत फिरकीपटू आर अश्विन सर्वात वर आहे. 73 डावात त्याला 62 षटकार पडले आहेत.
रवींद्र जडेजा दुसऱ्या क्रमांकावर असून 65 डावात 33 षटकार, कुलदीप यादवने 15 डावात 17 षटकार दिले आहेत.
मोहम्मद सिराजने 56 डावात 17 षटकार, तर मोहम्मद शमीने 47 डावात 6 षटाकर दिले आहेत.