आयपीएल 2025 दरम्यान या स्टार खेळाडूची एन्ट्री
29 March 2025
Created By: राकेश ठाकुर
आयपीएल 2025 स्पर्धेत आतापर्यंत 8 सामने झाले आहेत. असं असताना दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून एक बातमी समोर आली आहे.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात रूजू झाला आहे. सुरुवातीच्या सामन्यात संघाचा भाग नव्हता.
केएल राहुलच्या घरी छोटा पाहुणा आला आहे. पत्नी आथियाने मुलीला जन्म दिला. त्यामुळे लखनौ विरुद्धचा सामना खेळला नव्हता.
केएल राहुल आयपीएल 2025 स्पर्धेच्या सुरुवातीपासून टीमसोबत होता. पण पहिल्या सामन्यापूर्वी घरी जावं लागलं होतं.
केएल राहुल पहिल्यांदा दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळणार आहे. लिलावात दिल्लीने त्याच्यासाठी 14 कोटी मोजले होते.
दिल्लीला दुसरा सामना 30 मार्चला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात केएल राहुल दिल्लीसाठी पदार्पण करेल.
केएल राहुल आयपीएलमध्ये आतापर्यंत 132 सामने खेळला आहे. यात त्यने 45.46 च्या सरासरीने 4683 धावा केल्यात.