भारत-न्यूझीलंड कसोटीसाठी मोठा निर्णय, क्रीडारसिकांना लागली लॉटरी

21 सप्टेंबर 2024

Created By: राकेश ठाकुर

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. ही मालिका बंगळुरु, पुणे आणि मुंबईत होत आहे. 

न्यूझीलंडविरुद्धची शेवटची कसोटी मालिका 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे. या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट संघाने मोठा निर्णय घेतला आहे. 

एमसीएने सांगितलं की, भारत न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी तिकीटांचे दर वाढवणार नाही.

एमसीएने 2016 मध्ये कसोटीसाठी तिकीट दरात 25 टक्के वाढ केली होती. त्यावेळेस स्वस्त तिकीटाचे दर 100 वरून 125 रुपये केले होते.

संपूर्ण सामना पाहण्यासाठी एमसीएने तिकीट दर 300 वरून 375 रुपये केले होते. आता तेच दर असणार आहेत. 

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली फिटनेससाठी ओळखला जातो.