मिचेल स्टार्कने पाच विकेट घेऊन रचला इतिहास, नेमकं काय ते जाणून घ्या
30 March 2025
Created By: राकेश ठाकुर
दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. भेदक गोलंदाजीपुढे संपूर्ण संघ 163 धावांवर बाद झाला.
हैदराबादचा निम्मा संघ तंबूत पाठवण्यात मिचेल स्टार्कचा हात होता. त्याने 35 धावा देत 5 गडी बाद केले. आयपीएलमध्ये 5 विकेट घेणारा दिल्लीचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
17 वर्षापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी 5 विकेट घेतल्या होत्या. अमित मिश्राने डेक्कन चार्जर्ससाठी 2008 मध्ये 17 धावांवर पाच विकेट घेतल्या होत्या.
मिचेल स्टार्कने वयाच्या 35व्या वर्षी 5 विकेट घेत रेकॉर्ड केला आहे. आयपीएलमध्ये पाच विकेट घेणारा वयस्कर गोलंदाज ठरला आहे.
मिचेल स्टार्कने आयपीएल करिअरमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट घेतल्या आहेत. करिअरमध्ये नवा पल्ला गाठला आहे.