7 विकेट्स घेणारा मोहम्मद शमी असा राहतो फिट, वजन कमी करण्यासाठी..
16 November 2023
Created By : Manasi Mande
बुधवारी वर्ल्डकप 2023 न्युझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये मोहम्मद शमीने 7 विकेट्स घेतल्या.
मोहम्मद शमीच्या या सर्वश्रेष्ठ गोलंदाजीचे श्रेय त्याचे ट्रेनिंग आणि फिटनेसला जाते.
खरंतर काही काळापूर्वी शमीचं वजन खूप वाढलं होतं आणि तो जखमीही झाला होता. पण त्यानंतरही त्याने खूप उत्तम कमबॅक केलं.
शमीने त्याचा फिटनेस मिळवण्यासाठी खूप मेहनत केली.
मोहम्मद शमी सुरूवातीपासूनच देशी पद्धतीने ट्रेनिंग घेत होता. पण गरजेनुसार त्याने ट्रेनिंगही बदलले.
शमी जिममध्ये वेट ट्रेनिंग करतो, ज्याने स्ट्रेंथ वाढवण्यास खूप मदत मिळते.
तसेच त्याने कार्डिओ आणि हाय इंटेन्सिटी वर्कआऊटही केले.
बॉलिंग करताना खांदा आणि पाठीचे मसल्स खूप वापरले जातात. त्याने त्यावरही भर देत मेहनत केली.
पायांचे स्नायू बळकट करण्यासाठी त्याने लोअर बॉडी एक्सरसाइज करण्यावरही लक्ष दिले.
डाएटबद्दल बोलायचं झालं तर मोहम्मद शमी हा जंक फूड, फास्ट फूड पासून दूरच राहतो.
रिपोर्ट्सनुसार, तो इंटरमिटेंट फास्टिंग करतो. शमीला बिर्याणी खूप आवडते, पण त्याने त्याचाही त्याग केला.
कोहली-रोहितचे चाहते भिडले, सेमीफायनलआधीच वाद सुरू, नक्की काय झालं ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा