अजिंक्य रहाणेने 432 धावा ठोकत घडवला इतिहास 

13 डिसेंबर 2024

टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवलेला अजिंक्य रहाणेचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत धमाका

रहाणेची उपांत्य फेरीत बडोदाविरुद्ध 98 धावांची स्फोटक खेळी, मुंबई 6 विकेट्सने सामना जिंकून अंतिम फेरीत

रहाणे सलग तिसऱ्यांदा शतक करण्यापासून मुकला, मात्र त्यानंतरही त्याने विक्रम केलाय

रहाणे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील एका हंगामात 5 अर्धशतकं करणारा मुंबईचा पहिला फलंदाज ठरला आहे

रहाणेने आतापर्यंत या हंगामातील 7 सामन्यांमध्ये 432 धावा केल्यात, रहाणे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे

रहाणेने या हंगामात आतापर्यंत 19 सिक्स लगावले आहेत

दरम्यान 15 डिसेंबरला मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यात अंतिम सामना होणार आहे.