इंग्लंडविरुद्ध शान मसूदचं शतक, 1524 दिवसानंतर असं घडलं

7  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूदची बॅट अखेर चालली. शान मसूदने मुल्तानमध्ये सेंच्युरी ठोकली. 

शान मसूदने 1524 दिवसानंतर कसोटी शतक ठोकलं. त्याने 2020 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचं शतक ठोकलं होतं.

शान मसूदने 102 चेंडूत शतक ठोकलं. हे मसूदच्या कारकिर्दितलं वेगवान शतक आहे. 

पाकिस्तानमध्ये 10 वर्षानंतर इतकं वेगाने कसोटी शतक ठोकलं आहे. यापूर्वी 2014 मध्ये मिस्बाह उल हकने 56 चेंडूत कसोटी शतक ठोकलं होतं. 

कसोटीत सर्वात वेगवान शतक ब्रँडन मॅक्कलमच्या नावावर आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूने 54 चेंडूत शतक ठोकलं होतं.

भारताकडून सर्वात वेगवान कसोटी शतक मोहम्मद अझरुद्दीन ठोकलं होतं. 74 चेंडूत त्याने ही कामगिरी केली होती. 

भारताच्या 11 फलंदाजांनी कसोटीत 100 पेक्षा कमी चेंडूत शतक ठोकण्याची किमया केली आहे.