पाकिस्तानच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टबाबत मोठा निर्णय

15 July 2024

Created By:  Rakesh Thakur

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टप्रकरणी मोठा निर्णय घेतला आहे. 

पीसीबी आता कोणत्याच खेळाडूला तीन वर्षांचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट देणार नाही. आता प्रत्येक खेळाडूला एकाच वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. 

पीसीबी असा निर्णय घेतला असला तरी खेळाडूंच्या पगारात मात्र काही कपात केलेली  नाही. 

बाबर आझम, शाहीन अफ्रिदी आणि रिझवानला प्रत्येक महिन्याला 18 लाख रुपये मिळतात.

पीसीबी ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या खेळाडूंना 12 लाख आणि 5.40 लाख रुपये मिळतात. 

पीसीबीने सांगितलं की, 12 महिन्यांच्या करारासाठी खेळाडूंचा फिटनेस, वर्तन आणि फॉर्मचं आकलन केलं जाईल. 

प्रत्येक तीन महिन्यानंतर खेळाडूंची फिटनेस टेस्ट होईल आणि  पास करणं आवश्यक आहे.