बाबर आझमवरील फिक्सिंगच्या आरोपानंतर पीसीबी ॲक्शन मोडमध्ये
21 June 2024
Created By: राकेश ठाकुर
पाकिस्तानचं टी20 वर्ल्डकपमधील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे. यानंतर बाबर आझम रडारवर आला आहे.
बाबर आझमचं कर्णधारपद आणि फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. पण मॅच फिक्सिंगच्या आरोपाने खळबल उडाली आहे.
पाकिस्तानी युट्यूबरने आरोप करत सांगितलं की, फिक्सिंगसाठी बाबर आझमला कार गिफ्ट मिळाली. इतकंच काय तर या पैशातून जागा विकत घेतली.
आरोपानंतर पाकिस्तानी क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कारवाईचा बडगा उगारणार आहे.
पीसीबी ही कारवाई बाबर आझमवर नाही तर आरोप करणाऱ्या युट्यूबर आणि पत्रकारांवर करणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान टीमविरोधात खोट्या बातम्या देणाऱ्यांविरोधात पीसीबी न्यायालयाचं दार ठोठावणार आहे.
पाकिस्तान पंजाब सरकारने डिजिटल मिडिया आणि पत्रकारांवर खोट्या बातम्या रोखण्यासाठी कायदा पारीत केला आहे. यात दोषी आढळल्यास जेल आणि दंडाची तरतूद आहे.