पृथ्वी शॉचं करिअर संकटात, या तीन गोष्टी पुन्हा खाण्यास सुरुवात केली का?
22 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
टीम इंडियातून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉला आता मुंबईच्या रणजी संघातूनही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
रिपोर्टनुसार, पृथ्वी शॉला लठ्ठपणामुळे मुंबईने संघाबाहेर केलं आहे. तसेच त्याच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पृथ्वी शॉ फक्त 24 वर्षांचा आहे. पण रिपोर्टनुसार त्याच्या शरीरातील चरबीची टक्केवारी ही 35 टक्के आहे.
पृथ्वी शॉने नुकतीच एक मुलाखत दिली होती. त्यात वजन कमी करण्यासाठी तीन गोष्टी वर्ज्य केल्याचं सांगितलं होतं.
पृथ्वी शॉने सांगितलं होतं की, मिठाई, चायनीज आणि कोल्ड्रिंग सोडलं आहे.
आयपीएल 2023 नंतर शॉचं वजन खूप कमी झालं होतं. पण आता पुन्हा वाढल्याचं दिसत आहे. शॉने पुन्हा डायट मोडला आहे का?
पृथ्वी शॉने फिटनेसकडे लक्ष दिलं नाही तर संघात पुनरागमन कठीण आहे. आयपीएलमध्येही कोणी भाव देईल की नाही यात शंका आहे.