आर अश्विन शतकी खेळीसह या खास क्लबमध्ये झाला सामील

19  सप्टेंबर 2024

Created By: राकेश ठाकुर

भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. पहिला दिवस आर अश्विन आणि जडेजाने गाजवला.

टीम इंडियाने पहिल्या दिवशी 6 गडी गमवून 339 धावा केल्या. आर अश्विन नाबाद 102 धावांसह खेळत आहे.

आर अश्विनने 112 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या आहेत. यात 10 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.

आर अश्विनचं वय 38 वर्षे आणि दोन दिवस असून त्याने शतकी खेळी केली. अशी कामगिरी करणारा चौथा वयस्कर भारतीय ठरला. 

विजय मर्चंट यांनी 40 वर्षे आणि 21 दिवसांचे असताना शतक ठोकून या यादीत टॉपला आहेत. 

राहुल द्रविड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 38 वर्षे 307 दिवसांचा असताना शतक ठोकलं आहे. 

विनू मांकड या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. त्याने 38 वर्षे आणि 269 दिवसांचे असताना शतक ठोकलं होतं.