अयोध्येतून श्रीलंकेत जाण्यासाठी किती राज्यातून जावं लागतं?
26 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
चेन्नई सुपर किंग्स कर्णधार ऋतुराजपेक्षा हा खेळाडू कमवणार जास्त रुपये
28 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. तत्पूर्वी 31 ऑक्टोबरपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव द्यायची आहेत.
मेगा ऑक्शनपूर्वी सहा खेळाडू रिटेन करण्याची परवानगी आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स कोणाला रिटेन करणार?
क्रिकबजनुसार, धोनी या पर्वातही खेळणार आह. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा आणि मथीशा पथिराणा यांना रिटेन करू शकते.
डेवॉन कॉनवे, समीर रिझवी आणि शिवम दुबेपैकी दोघांना रिटेन केलं जाईल. त्यामुळे लिलावात एक आरटीएम मिळू शकेल.
रिपोर्टनुसार, अष्टपैलू रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा नंबर 1 रिटेन्शन असेल. त्यामुळे त्याला कमीत कमी 18 कोटी मिळतील.
कर्णधार ऋतुराज गायकवाड हा नंबर 2 चा रिटेन्शन खेळाडू असेल. त्याला 14 कोटी रुपये मिळतील. त्याची किंमतीही वाढू शकते.
महेंद्रसिंह धोनीला अनकॅप्ड प्लेयर म्हणून रिटेन केलं जाईल. त्याच्यासाठी फक्त 4 कोटी खर्च करावे लागतील.