634 दिवसानंतर कसोटी क्रिकेटमध्ये दिसणार असं दृश्य

18  सप्टेंबर 2024

Created By: राकेश ठाकुर

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून होत आहे. पहिला सामना चेन्नईत होणार आहे.

हा कसोटी सामना एका खेळाडूसाठी खास असणार आहे. कारण 634 दिवसानंतर कसोटीत परतणार आहे. 

यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कसोटीत पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. 634 दिवसानंतर कसोटी खेळणार आहे. 

ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल असे संकेत गौतम गंभीरने दिले आहेत. पंतने या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. 

ऋषभ पंतने 2022 च्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर अपघात झाला होता. 

ऋषभ पंतने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत भाग घेतला होता आणि टीम बीकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. 

ऋषभ पंतने आतापर्यंत 33 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 2271 धावा केल्या आहेत. यात बहुतांश मॅच विनिंग खेळी आहेत.