रोहित शर्माने माझी माफी मागितली! संजू सॅमसनचा मोठा खुलासा

22  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

संजू सॅमसनने नुकतीच एका यूट्युब चॅनेलला मुलाखत देत सांगितलं की, टी20 वर्ल्डकप फायनल खेळणार होतो. 

कर्णधार रोहित शर्माने अंतिम फेरीसाठी तयार राहायला सांगितलं होतं. पण टॉसच्या आधी प्लेइंग 11 मधून नाव वगळलं. 

टॉसला जाण्यापूर्वी रोहित शर्मा आला आणि म्हणाला की, मागच्या सामन्यातील प्लेइंग 11सोबत जाणार आहे. या दरम्यान त्याने माफी मागितली. 

सॅमसनने सांगितलं की, 'मला समजावण्यासाठी बाजूला घेऊन गेला आणि 10 मिनिटं चर्चा केली. संजू तू समजतोस ना, असा निर्णय का घेत आहे.'

संजूला प्लेइंग 11 मध्ये स्थान न मिळाल्याने दु:ख झालं होतं. पण त्याने रोहितला चांगल्याप्रकारे उत्तर दिलं. 'ठिक आहे, पहिल्यांदा मॅच खेळूया. जिंकूया आणि मग यावर बोलूया.'

रोहितचं म्हणणं ऐकलं आणि संजूने सांगितलं की, 'मी तुला समजून घेतो. पण मला तुझ्या कर्णधारपदाखाली अंतिम सामना खेळता आला नाही याचं दु:ख राहील. माहिती नाही परत अशी संधी कधी मिळेल.'

सॅमसनने सांगितलं की, फायनलपूर्वी 10 मिनिटं अशी चर्चा होणं माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. तेव्हा समजलं की रोहित शर्मामध्ये काही वेगळी गोष्ट आहे.