25 डिसेंबर 2024
75 वर्षात कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम
रोहित शर्माचा कसोटी क्रिकेटमधील वाईट काळ संपण्याचं नाव घेत नाही. मेलबर्नमधील पहिल्या डावात पुन्हा फेल गेला.
रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत 5 चेंडूंचा सामना करत फक्त 3 धावा करून बाद झाला.
रोहित शर्माने पॅट कमिन्सच्या चेंडूवर अर्धवट पुल शॉट मारण्याच्या नादात आऊट झाला.
रोहित शर्मा SENA देशात सर्वात कमी सरासरी असणारा कर्णधार ठरला आहे.
रोहित शर्मा मागच्या 75 वर्षात SENA देशात सर्वात कमी सरासरीने धावा करणारा कर्णधार आहे. त्याने 10 डावात फक्त 15.55 च्या सरासरीने धावा केल्या.
रोहित शर्माने मागच्या 14 कसोटी डावात फक्त 11.07 च्या सरासरीने 155 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियात रोहित शर्मा फक्त 22 धावा करू शकला आहे. तर बुमराहने या दौऱ्यात 25 विकेट घेतल्या आहेत.