25 नोव्हेबर 2024
विराट कोहलीचा मुलगा अकायबाबत पसरली अशी अफवा, बहिणीला द्यावं लागलं स्पष्टीकरण
Created By: राकेश ठाकुर
विराट कोहली पर्थमध्ये शतकाच्या दिशेने कूच करत असताना त्याच्या मुलाबाबत एक अफवा पसरली होती.
पर्थ कसोटीदरम्याने एका मुलाचा फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो अकायचा असल्याचा दावा केला जात होता. पण ही अफवा निघाली आहे.
विराट कोहलीच्या बहिणीने या बातमीचं खंडन केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मुलगा विराटचा नाही, असं भावना कोहलीने सांगितलं आहे.
भावना कोहलीने इन्स्टाग्रामवर लिहिलं की, ज्या मुलाला विराटचा समजत आहेत तो त्याच्या मित्राचा मुलगा आहे. अकाय नाही.
विराट कोहलीने मुलांचे फोटो क्लिक करून नका अशी अपील आधीच मीडियाला केली आहे. त्यामुळे त्यांचे चेहरे समोर आले नाहीत.
विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून शतकी खेळी केली आहे. तसेच टीम इंडियाने विजयही मिळवला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढचा कसोटी सामना एडिलेडमध्ये होणार आहे. हा सामना 6 डिसेंबरला होणार आहे.