ऋतुराजने केएल राहुलचा विक्रम मोडला, काय ते वाचा
1 December 2023
Created By: Rakesh Thakur
भारतासाठी सर्वात जलद 4000 टी20 धावा करणारा फलंदाज ठरला.
ऋतुराजने 28 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 32 धावांची खेळी केली.
ऋतुराज गायकवाडने टी20 मध्ये 116 डावात 4000 धावा पूर्ण केल्या.
यापूर्वी हा विक्रम केएल राहुलच्या नावावर होता. 117 डावात हा पराक्रम केला होता.
वेगाने 4000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डेव्हॉन कॉनवेसह चौथ्या स्थानावर आहे.
भारतासाठी सलग तीन टी20 डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऋतुराज गायकवाड चौथ्या स्थानावर आहे.
सलग तीन टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे.