सचिनने कांबळीला कोणत्या मुलीसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला होता?
विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून आरोग्य आणि आर्थिक कारणांमुळे चर्चेत आहे.
विनोद कांबळीवर ठाण्यातील रुग्णालयात 10 दिवस उपचार झाले. त्यानंतर बरा होऊन घरी परतला आहे.
कांबळीची पत्नी अँड्रिया हेविटने एका मुलाखतीत जे सांगितलं त्याबाबत खूपच कमी लोकांना माहिती आहे.
अँड्रियाने सांगितलं की, सचिन तेंडुलकरनेच विनोद कांबळीला माझ्यासोबत लग्न करण्याचा सल्ला दिला होता.
अँड्रियाने सांगितलं की, 2006 मध्ये लग्न करण्यापूर्वी विनोद कांबळी इतर मुलींसोबत फिरायचा. हे सचिनला आवडत नव्हतं आणि त्याने माझ्यासोबत लग्न करण्याचा सल्ला दिला होता.
अखरे विनोद कांबळीने मित्राचा सल्ला ऐकला आणि 2006 मध्ये अँड्रियासोबत लग्न केलं. तेव्हापासून दोघं एकत्र आहेत.
लग्न करण्यापूर्वी अँड्रियाने कांबळीला दारू सोडण्याची अट ठेवली होती. सहा वर्षे त्याने ही अट पाळली. त्यानंतर पुन्हा त्याला लत लागली.
एका मुलाखतीत सचिनबाबत चुकीचं वक्तव्य केल्याने कांबळी सर्वांच्या रडारवर आला होता. पण असं असूनही सचिनने मुलांची फी भरली होती.