17  डिसेंबर 2024

दक्षिण अफ्रिकेत शतकी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला टीममधून वगळलं

टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. पण विजय हजारे ट्रॉफीत खेळणार नाही. 

संजू सॅमसनला केरळ संघात स्थान मिळालं नाही. मंगळवारी संघाची घोषणा झाली पण संजूला वगळलं.

केरळने संजू सॅमसन ऐवजी सलमान निजारला कर्णधार केलं आहे. 

संजू सॅमसन दक्षिण अफ्रिका दौऱ्यानंतर सैयद मुश्ताक अली स्पर्धेत खेळला. 3 डिसेंबरला त्याने आंध्रविरुद्ध शेवटचा सामना खेळला. 

पृथ्वी शॉलाही मुंबईने संघातून वगळलं आहे. कारण तो सैयद मुश्ताक अली स्पर्धेत अपयशी ठरला होता. 

मुंबई संघातून वगळल्याने पृथ्वी शॉने नाराजी व्यक्त केली आहे. आकडेवारी मांडून त्याने आपली बाजू स्पष्ट केली आहे. 

विजय हजारे ट्रॉफी 21 डिसेंबरपासून सुरु होईल. अंतिम सामना 18 जानेवारीला होणार आहे.