संजू सॅमसनने शून्यावर बाद होत 9 भारतीय खेळाडूंशी केली बरोबरी

29 July 2024

Created By: राकेश ठाकुर

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला ओपनिंग करण्याची संधी मिळाली होती. 

संजू सॅमसनकडे स्वत:ला सिद्ध करण्याची संधी होती. पण तसं काही झालं नाही.

संजू सॅमसन पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि तंबूत परतला. यासह त्याने 9 भारतीय खेळाडूंशी बरोबरी केली.

संजू सॅमसन दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. गोल्डन डकवर बाद होत  9 खेळाडूंच्या पंगतीत बसला.

विराट कोहली, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, ऋषभ पंत, अक्षर पटेल, केएल राहुल, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव दोनदा गोल्डन डकवर बाद झाले आहेत.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डकवर बाद होण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे.

रोहित शर्मा टी20 क्रिकेटमध्ये पाचवेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. 

श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर तीन वेळा गोल्डन डकवर बाद झाले आहेत.