वुमन्स टी20 क्रिकेटमध्ये हिजाब परिधान करून उतरली क्रिकेटपटू

3 ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात बांगलादेशने स्कॉटलंडला पराभूत केलं. 

या सामन्यात अबताहा मकसूद हिजाब परिधान घालून मैदानात उतरली होती. ती स्कॉटलंडकडून खेळते. 

इस्लाम धर्मात मुलींना हिजाब महत्त्वाचं मानलं जातं. अबताह मकसूद इस्लाम धर्मातून येते.

25 वर्षीय अबताहा मकसूद लेग स्पिनर आहे. 2018 पासून स्कॉटलंडकडून खेळते.

अबताहा मकसूदचा जन्म 11 जून 1999 रोजी ग्लासगोमध्ये झाला. तिने वयाच्या 11 व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 

अबताहा मकसूद ही तायक्वांदोमधील ब्लॅक बेल्ट आहे. 2014 च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत ती देशाची ध्वजवाहक होती. 

अबताहा मकसूदने बांगलादेशविरुद्ध चार षटकं टाकली. 24 धावा दिल्या आणि एकही विकेट घेता आली नाही.