टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने एका मुलाखतीत गर्लफ्रेंड आणि दुसऱ्या लग्नाबाबत स्पष्ट काय ते सांगितलं.
धवनला सर्वात आधी गर्लफ्रेंडचं नाव विचारलं तर त्याने स्पष्ट सांगितलं की, मी ते सांगणार नाही. पण हॉलमध्ये बसलेली सुंदर मुलगी त्याची गर्लफ्रेंड आहे.
धवनला दुसऱ्या लग्नाची तारीख विचारली तेव्हा त्याने ते सांगण्यास नकार दिला. जेव्हा इच्छा होईल तेव्हा करू, यात काही टेन्शन नाही?, असं म्हणाला.
मुलाखतीवेळी सोफी शाइन तिथे उपस्थित होती. गेल्या काही दिवसांपासून तिच्यासोबत त्याचं नाव जोडलं जात आहे. तीच धवनची गर्लफ्रेंड असावी असा दावा केला जात आहे.
धवन आणि सोफी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांनी एकत्र एका लग्नात हजेरी लावली होती.
शिखर धवनने 2012 मध्ये आयशा मुखर्जीसोबत लग्न केल होतं. दोघांना एक मुलगा आहे.
धवनचं लग्न 11 वर्षे टिकलं. त्यानंतर 2023 मध्ये घटस्फोट झाला. तेव्हापासून धवन एकटाच आहे आणि मुलगाही त्याच्यासोबत नाही.